‘मी या शेताला बाळासारखं मोठं केलं होतं’ सोयगावमधल्या शेतकऱ्यांची कहाणी
‘मी या शेताला बाळासारखं मोठं केलं होतं’ सोयगावमधल्या शेतकऱ्यांची कहाणी
जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या सोयगाव तालुक्यातील घोसला गावात 18 सप्टेंबरच्या पावसाने थैमान घातलं. ढगफुटीमुळे उभी पिकं पाण्याच्या लोटात आडवी झाली.
ढगफुटीनंतर पाण्याच्या प्रवाहाने शेताचे अक्षरशः दोन भाग केले. अनेकांच्या शेतजमिनीच वाहून गेल्या. शेत खरडून जाण्याच्या कहाण्या सांगताना शेतकरी रडत होते. आजच महाराष्ट्र सरकारने शेतकरी पॅकेज जाहीर केलं आहे.
रिपोर्ट- दीपाली जगताप
शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






