बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांची 'जंगलात शेळ्या सोडण्याची' कल्पना
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांची 'जंगलात शेळ्या सोडण्याची' कल्पना
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी बिबट्यांनी हल्ले केले. पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत या घटना मोठ्या प्रमाणात होताना दिसल्या.
विधिमंडळाचं अधिवेशन 8 डिसेंबरला सुरू झाल्यापासून नागपूरमध्येच दोनवेळा, तर रायगड आणि बीडमध्येही बिबट्या नागरी वस्तीत आल्याच्या घटना घडल्या.
विधानसभेत याबद्दल चर्चा होत असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी या प्रश्नावर उपाययोजनांबाबत घोषणा केल्या. यात AI चा वापर, पिंजऱ्यांची व्यवस्था चा समावेश होताच. पण त्याचबरोबर 1 कोटी रुपये खर्च करून जंगलांमध्ये शेळ्या सोडाव्या जेणेकरून वाघ-बिबटे त्या खातील आणि वस्तीत शिरणार नाहीत असं म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






