BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीडिओ, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांनी नागपुरात कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर झोपून काढली रात्र, वेळ 10,31
नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शालेय पोषण आहारासाठी काम करणाऱ्या तसंच इतर शासकीय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या महिलांनी धडक मोर्चा काढला.
पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेचे माजी प्रमुख फैज हमीद यांना 14 वर्षांचा तुरुंगवास
पाकिस्तानच्या पंजाबमधील चकवालचे असणारे, फैज हमीद यांनी ब्रिगेडियर म्हणून आपल्या कारकिर्दीत रावळपिंडीमध्ये 10 कोअरच्या 'चिफ ऑफ स्टाफ'चे पदही सांभाळले आहे.
प्रेम चोप्रा यांना झालेल्या हृदयाच्या 'अक्यूट एओर्टिक स्टेनोसिस' या आजारावर उपचार काय आहेत?
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता प्रेम चोप्रा यांच्यावर हृदयाशी संबंधित एका आजारानंतर वॉल्व इम्प्लांटेशनची शस्त्रक्रीया करण्यात आली. याबद्दल त्यांचे जावई, अभिनेता शर्मन जोशी यांनी माहिती दिली.
धुरंधर : स्वत:च्या आईचीही हत्या करणारा 'खरा' रहमान डकैत किती खतरनाक होता? त्याचा शेवट नेमका कसा झाला होता?
'धुरंधर' या चित्रपटात अभिनेता अक्षय खन्नानं याच रहमान डकैतची भूमिका केली आहे. या भूमिकेची आणि रहमात डकैतची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे.
'मतचोरीला नेहरुच जबाबदार', अमित शाहांचे वक्तव्य; मतचोरीच्या मुद्द्यावरुन संसदेत काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी (10 डिसेंबर) लोकसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेत सहभागी झाले.
गोव्यातल्या आग लागलेल्या नाईट क्लबचे मालक थायलंडला पळाले, पण त्यांना भारतात आणणार कसं?
��रराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार भारताचे एकूण 48 देशांशी प्रत्यर्पण करार आहेत. यामध्ये बांगलादेश, भूतान, नेपाळ यांसारखे शेजारी देश तसेच इस्रायल, सौदी अरेबिया, रशिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका यांसारखे देशही आहेत.
आग लागल्यावर भाजण्यापेक्षा धुरात गुदमरून अधिक मृत्यू का होतात?
आगीत गोष्टी जळतात तेव्हा त्यातून विषारी वायू बाहेर पडतात ज्यांचा फुफ्फुसांवर परिणाम होतो. वातावरणातल्या ऑक्सिजनचं प्रमाण जसजसं कमी होत जातं तसे मानवी शरीरावर त्याचे परिणाम होतात. गोंधळल्यासारखं होतं, डोकं दुखतं, गरगरतं त्यातून पुढे शुद्ध हरपते.
धुरंधरमधलं अक्षय खन्नाच्या एन्ट्रीचं अरेबिक गाणं व्हायरल; या गाण्याची आणि गायकाची गोष्ट
'रहमान डकैत'च्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नासोबतच, चित्रपटाच्या एका सीनमध्ये त्याच्या बलोच नेत्याला भेटीच्या वेळीचं गाणं (एंट्री साँग) सध्या खूप खूप चर्चेत आहे.
वाघांपासून मुलांचं रक्षण करणाऱ्या 4 माता; रात्रीच्या काजळीत 'वाघाच्या काळजा'चे दर्शन
वाघाच्या दहशतीत रात्रीच्या किर्र अंधारात हातात काठी घेऊन विद्यार्थ्यांचं संरक्षण करणाऱ्या चार धाडसी महिलांची गोष्ट
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या वनमंत्र्यांची 'जंगलात शेळ्या सोडण्याची' कल्पना, वेळ 3,57
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी बिबट्यांनी हल्ले केले. पुणे, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत या घटना मोठ्या प्रमाणात होताना दिसल्या.
व्हीडिओ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी बीबीसी मराठीला दिलेली शेवटची मुलाखत, जाणून घ्या ते काय म्हणाले होते, वेळ 42,48
महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले डॉ. बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ते ओळखले जात होते. डॉ. बाबा आढावांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता.
व्हीडिओ, ‘लग्न मोडलं...’; स्मृती मंधानाने नेमकी काय माहिती दिली?, वेळ 1,23
भारताची क्रिकेटर स्मृती मंधानानं तिचं लग्न रद्द झालं असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
व्हीडिओ, लाईफ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? विम्याची रक्कम किती असावी?, वेळ 4,51
इन्शुरन्स ही गरज आहे, अनिश्चिततेच्या काळातला हा आर्थिक आधार आहे हे सगळं बोललं जात असलं, तरी प्रत्यक्षात लाईफ इन्शुरन्सविषयी फार कमी जागरूकता आहे.
व्हीडिओ, मानवी मेंदूत संपूर्ण आयुष्यात कोणत्या वयात मोठे बदल होतात? वैद्यकीय संशोधन काय सांगतं?, वेळ 4,34
वय वाढतं तसं आपला मेंदूही 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जातो. वयाच्या ठराविक वर्षी मेंदूमध्ये मोठे बदल घडतात असं एका संशोधनातून समोर आलंय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : गोव्यात नाईटक्लब आगीत 25 मृत्यू, जबाबदारी कुणाची? पर्यटनाला फटका बसणार?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : आगीत गुदमरून मरणाऱ्यांचा आकडा मोठा का असतो? धूर इतका जीवघेणा का ठरतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : हा देश काही खास लोकांना नागरिकत्व का देतो आहे?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.
संत तुकाराम महाराज यांना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी विद्रोही का म्हटलं?
बीबीसी मराठीवरील 'महाराष्ट्राची गोष्ट' या मुलाखतींच्या मालिकेत डॉ. साळुंखे यांची बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी मुलाखत घेतली आहे.

































































