‘लग्न मोडलं...’; स्मृती मंधानाने नेमकी काय माहिती दिली?
‘लग्न मोडलं...’; स्मृती मंधानाने नेमकी काय माहिती दिली?
भारताची क्रिकेटर स्मृती मंधानानं तिचं लग्न रद्द झालं असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छलचा विवाह होणार होता. मात्र लग्नाच्या दिवशी सकाळीच स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर लग्न स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






