पर्यावरणपूरक बांधकाम शिकवणारं पुण्यातलं 'हुन्नर गुरूकुल' काय आहे?

व्हीडिओ कॅप्शन, पर्यावरणपूरक बांधकाम शिकवणारं पुण्यातलं हुन्नर गुरूकुल
पर्यावरणपूरक बांधकाम शिकवणारं पुण्यातलं 'हुन्नर गुरूकुल' काय आहे?

हुन्नर गुरूकुल... नावच कसलं भारी आहे!

हुन्नर म्हणजे कौशल्य आणि गुरूकुल म्हणजे पूर्णवेळ शिकण्याची जागा.

पुण्याच्या खेड-शिवापूरमध्ये असलेलं हे गुरूकुल गरीब पण शिकण्याची भूक असलेल्या तरुणांना एक वर्षाचं मोफत प्रशिक्षण देतं. इथे तरुणांना बांधकाम आणि सुतारकाम शिकवलं जातं. या संस्थेची सुरुवात 2018 ला झाली. सात वर्षांत विद्यार्थ्यांच्या 7 बॅचेस झाल्या आणि त्यातून 150 विद्यार्थी शिकून बाहेर पडले.

हुन्नर गुरूकुल 17 ते 25 वयोगटातील विद्यार्थी निवडतं. निवडण्याची पद्धत तर एकदम बारकाईने केली जाते. योग्य मुलालाच संधी मिळेल याची पुरेपुर काळजी घेतली जाते.

  • रिपोर्ट, शूट आणि एडिटिंग - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)