ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी बीबीसी मराठीला दिलेली शेवटची मुलाखत, जाणून घ्या ते काय म्हणाले होते
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी बीबीसी मराठीला दिलेली शेवटची मुलाखत, जाणून घ्या ते काय म्हणाले होते
महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असलेले डॉ. बाबा आढाव यांचे निधन झाले आहे. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ते ओळखले जात होते.
डॉ. बाबा आढावांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा खोलवर प्रभाव होता. त्यातूनच त्यांनी हमाल पंचायत सारख्या संघटनेची स्थापना केली होती. जातीय भेदभावाला विरोध म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर एक गाव एक पाणवठा ही चळवळ चालवली होती.
बीबीसी मराठीच्या महाराष्ट्राची गोष्ट या विशेष मुलाखतींच्या मालिकेत नोव्हेंबर 2024 मध्ये बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्याशी बोलताना त्यांनी जातीभेद, महिलांचे हक्क, प्रबोधनाची चळवळ, परिवर्तनवादी चळवळीपुढची आव्हाने, विचारवंतांची भूमिका याबाबत मांडणी केली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






