अंध महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी महाराष्ट्राची गंगा कदम, असा आहे तिचा प्रेरणादायी प्रवास

व्हीडिओ कॅप्शन, अंध महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी महाराष्ट्राची गंगा कदम सांगते...
अंध महिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारी महाराष्ट्राची गंगा कदम, असा आहे तिचा प्रेरणादायी प्रवास

भारताने पहिला अंध महिला क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला आहे.

या विजयी संघात हिंगोलीत जन्मलेली आणि सोलापुरात शिक्षण घेतलेली गंगा कदम उपकर्णधार म्हणून चमकली.

दृष्टी मर्यादित असली तरी गंगानं स्वप्नांना कधीच मर्यादा घातल्या नाहीत. संघर्षातून मार्ग काढत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली गंगा आज हजारो मुलींसाठी आणि अपंग तरुणांसाठी प्रेरणादायी आशेचा किरण बनलीय.

अंध क्रिकेट नेमकं कसं खेळलं जातं? गंगाचा खेळातील प्रवास इतका आव्हानात्मक का होता?

जाणून घेण्यासाठी पाहा बीबीबी मराठी प्रतिनिधी गणेश पोळ यांचा खास ग्राउंड रिपोर्ट.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.