मुलीसाठी रेल्वे प्रशासनाशी लढणाऱ्या डॉ. पंकज मारू यांची प्रेरणादायी कहाणी
मध्य प्रदेशचे रहिवासी डॉ. पंकज मारू यांनी आपल्या मुलीसाठी अनेक वर्षे रेल्वे प्रशासनासोबत एक लढाई लढली. या लढ्यामुळे देशातील लाखो अपंग नागरिकांना सन्मान मिळाला.
पंकज मारू यांची मुलगी सोनू 65 टक्के बौद्धिक अपंग आहे. तिला रेल्वेतील प्रवासासाठी सवलतीचं कार्ड मिळावं यासाठी एक साधा अर्ज देण्यापासून एक असा लढा सुरू झाला, जो सरकारी कागदपत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दलचा ऐतिहासिक लढा बनला.
पंकज यांनी जेव्हा सोनूचं नवीन रेल्वे सवलत कार्ड पाहिलं, तेव्हा त्यात 'अपंगत्वाच्या प्रकारा'अंतर्गत 'मानसिक विकृती' असं लिहिलेलं होतं.
ते पाहून पंकज अतिशय अस्वस्थ झाले.
त्यांनी म्हटलं की, "मानसिक विकृती' असं कोणी कसं काय लिहू शकतं? हा अपमानास्पद शब्द आहे."
आणि त्याच क्षणी सर्वकाही बदललं.
मुलीच्या हक्कांसाठी रेल्वे प्रशासनासोबत सुरू झालेला हा संघर्ष अखेर त्यांच्या विजयाने संपला. या व्हिडीओच्या माध्यमातून पाहा त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची कथा.
व्हीडिओ : आशय येगडे आणि प्रभात कुमार
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






