मानवी मेंदूत संपूर्ण आयुष्यात कोणत्या वयात मोठे बदल होतात? वैद्यकीय संशोधन काय सांगतं?

व्हीडिओ कॅप्शन, मानवी मेंदूत संपूर्ण आयुष्यात कोणत्या वयात मोठे बदल होतात? वैदयकीय संशोधन काय सांगतं?
मानवी मेंदूत संपूर्ण आयुष्यात कोणत्या वयात मोठे बदल होतात? वैद्यकीय संशोधन काय सांगतं?

वय वाढतं तसं आपला मेंदूही 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जातो. आणि वयाच्या ठराविक वर्षी मेंदूमध्ये मोठे बदल घडतात असं एका संशोधनातून समोर आलंय.

इतकंच नाही...शारीरिक पौगंडावस्था ठराविक वर्षं राहत असली, तरी पुढची अनेक वर्षं मेंदू मात्र पौगंडावस्थेत असतो - हे देखील यातून पहिल्यांदाच समोर आलंय.

सध्या आपल्यापैकी अनेकांना भेडसावणारे मानसिक आरोग्याचे प्रश्न किंवा वयाच्या एखाद्या टप्प्यावर येणारा डिमेन्शिया याबद्दल अधिक समजून घेण्यासाठी या संशोधनाची मदत होणार आहे.

मेंदूमधल्या बदलांचे हे टप्पे कोणते आहेत. आणि त्यावेळी काय घडतं.

जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : जेम्स गॅलाघर

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)