भारतीय नागरिकांनाही लक्षद्वीपला जाणं सोपं नाही, कारण...

@narendramodi

फोटो स्रोत, @narendramodi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर पर्यटनाची आवड असणाऱ्या आणि नसणाऱ्या बहुतांश लोकांना लक्षद्वीप नेमकं कुठे आहे? लक्षद्वीपला जायचं असेल तर काय करावं लागतं? मालदीव आणि लक्षद्वीप��ा पर्याय असणाऱ्यांनी जर लक्षद्वीपची निवड केली तर त्यासाठीची प्रक्रिया काय आहे? असे प्रश्न पडले असतील.

केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या 36 बेटांच्या समूहाला लक्षद्वीप असं म्हणतात.

लक्षद्वीपचे क्षेत्रफळ सुमारे 32 चौरस किलोमीटर आहे. मालदीवच्या क्षेत्रफळाच्या हे 10 पट कमी आहे. लक्षद्वीपमध्ये सुमारे 64 हजार लोक राहतात.

या केंद्रशासित प्रदेशात जाण्यासाठी भारतीय नागरिकांना एक विशिष्ट परवाना काढणं गरजेचं असतं.

त्यासाठी ट्रॅव्हल एजंटच्या मदतीने किंवा स्वतः वेबसाईटवर जाऊन रीतसर अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर सात दिवसांच्या मुदतीत लक्षद्वीप ��्रशासनाला तुम्हाला परवाना द्यावा लागतो.

थोडक्यात काय तर शिमला, मनाली, गोवा याठिकाणी जाताना ज्या पद्धतीने आपण लगेच निघू शकतो तेवढी सुलभता अजून लक्षद्वीपच्या बाबतीत आलेली नाही.

लक्षद्वीपचं भौगोलिक स्थान आणि तिथल्या नैसर्गिक परिस्थितीमुळं लक्षद्वीप एक विशिष्ट कायद्याअंतर्गत तिथे येणाऱ्या पर्यटक आणि इतर लोकांना परवाने देत असतं.

लक्षद्वीपमध्ये कोणता कायदा लागू होतो?

लक्षद्वीप प्रशासनाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 'लाकदिव्ह, मिनि��ॉय आणि अमिनदिवी बेटे (प्रवेश आणि निवासावरील निर्बंध) नियम, 1967 नुसार या बेटांवर जाण्यासाठी प्रवेशाचा परवाना मिळवणं आवश्यक आहे.

जो व्यक्ती या बेटांवरचा मूळ रहिवासी नाहीत, अशा प्रत���येक व्यक्तीला लक्षद्वीपमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि तिथे राहण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याकडून विहित नमुन्यात परवानगी मिळवावी लागते.

फक्त या बेटांवर काम करणाऱ्या किंवा भेट देण्यासाठी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना आणि सशस्त्र दलाच्या सदस्यांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

लक्षद्वीप

फोटो स्रोत, U.T. ADMINISTRATION OF LAKSHADWEEP

परदेशी पर्यटकांना जर हा परवाना मिळवायचा असेल त्यांच्याकडे वैध पासपोर्ट आणि भारतासाठी लागणार व्हिसा असणं गरजेचं आहे.

लक्षद्वीप टुरिझमच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इथे राहणाऱ्या आदिवासी जमातींचं रक्षण व्हावं म्हणून ही परवानगी मिळवणं गरजेचं आहे. याच वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार लक्षद्वीपमध्ये 95% अनुसूचित जमातीचे लोक राहतात.

लक्षद्वीपला जायचा परवाना कसा मिळवावा?

लक्षद्वीप प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रवेश आणि निवास नियम 1967 अंतर्गत हा परवाना मिळवण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध असणारा प्रवेशासाठीचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. हा फॉर्म वेबसाईटवर डाउनलोड करता येतो.

हा फॉर्म भरून प्रशासकाकडे सादर केला पाहिजे. यासाठी 50 रुपयांचं शुल्क भरावं लागतं.

भारतीय नागरिकांना हे परमिट मिळवायचं असेल तर ते ज्या जिल्ह्यात राहतात तिथल्या पोलिस आयुक्तांकडून पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं आहे.

लक्षद्वीपची वेबसाइट

फोटो स्रोत, https://epermit.utl.gov.in/

फोटो कॅप्शन, लक्षद्वीपची वेबसाइट

याशिवाय अर्जदाराने तीन पासपोर्ट आकाराच्या फोटोसह ओळखपत्राची स्वयं-साक्षांकित प्रत सादर करणं गरजेचं आहे. परमिट मंजूर झाल्यानंतर, प्रवाशाला लक्षद्वीपमध्ये आल्यानंतर ते सोबत बाळगणं बंधनकारक आहे.

लक्षद्वीप प्रशासनाच्या https://epermit.utl.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन पर्यटक हा परवाना मिळवू शकतात.

कोणत्या प्रकारचे परवाने मिळतात?

प्रवेश परवाना: भारतीय नागरिकांसह सर्व पर्यटकांना लक्षद्वीपला भेट देण्यासाठी एंट्री परमिट (EP) घेणे आवश्यक आहे. अधिकृत ट्रॅव्हल एजंट किंवा लक्षद्वीप पर्यटन विभागाशी संपर्क साधून ईपी मिळवता येईल.

प्रतिबंधित क्षेत्र परवानगी: लक्षद्वीपमधील काही बेटांना त्यांच्या संवेदनशील पर्यावरणीय आणि सामरिक महत्त्वामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. या प्रतिबंधित बेटांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी एंट्री परमिट शिवाय 'प्रतिबंधित क्षेत्र परवाना' (RAP) मिळवणं गरजेचं आहे.

'आरएपी'साठी नियुक्त अधिकाऱ्यांमार्फत अर्ज केला जाऊ शकतो आणि या प्रतिबंधित क्षेत्रांना भेट देताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि परवानग्यांचे पालन करणं आवश्यक आहे.

ज्या पर्यटकांना लक्षद्वीप बेटांवर जाऊन शूटिंग किंवा संशोधन करायचं असेल त्यांच्यासाठी हा विशेष परवाना काढणं आवश्यक आहे.

लक्षद्वीपमधल्या कोणत्या बेटांवर जाता येतं?

लक्षद्वीपमधल्या 10 बेटांवर मानवी वस्ती आहे. कवरत्ती, अगत्ती, अमिनी, कदम, किलाटन, चेतलाट, बित्रा, अंदोह, कल्पना आणि मिनीकॉय ही ती बेटं आहेत. बित्रा बेटावर फक्त 271 लोक राहतात आणि बंगाराम नावाच्या निर्जन बेटावर फक्त 61 लोक राहतात.

लक्षद्वीप बेटांवर मल्याळम भाषा बोलली जाते. फक्त मिनिकॉय बेटावर लोक माहे बोलतात, माहे भाषेची लिपी धिवेही आहे. मालदीवमध्येही हीच भाषा बोलली जाते.

मासेमारी आणि नारळाची शेती हे दोन प्रमुख व्यवसाय आहेत. लक्षद्वीपमधील पर्यटन उद्योगही झपाट्याने वाढला आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, @NARENDRAMODI

काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 25 हजार लोक लक्षद्वीपला गेले होते. म्हणजे ही संख्या मालदीवमध्ये जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येपेक्षा जवळपास आठ पट कमी आहे.

कोचीपासून लक्षद्वीपला जहाजाने 12 तासांत पोहोचता येतं. इथे जाण्यासाठी किती पैसे लागतील हे तुम्ही कोणत्या बेटावर आणि किती दिवसांसाठी जाणार आहात यावर अवलंबून आहे. लक्षद्वीपमध्ये हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)